ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 288 वर पोहचला आहे. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. या दुर्घटनेमुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झालं असून, त्यांच्या पाठिशी उभं राहण्याची गरज आहे. सर्व खासदारांनी आपला एक महिन्याचा पगार या अपघातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी द्यावा असं आवाहन खा. वरुण गांधी यांनी केलं आहे.
वरुण गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “ओडिशातील रेल्वे दुर्घटना विदारक आहे. ज्या कुटुंबियांना या दुर्घटनेमुळं उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांच्यासोबत पहाडासारखं उभं रहावं लागेल. माझं सर्व खासदारांना आवाहन आहे की आपण सर्वांनी आपल्या पगारातील एक हिस्सा या पीडित कुटुंबियांसाठी देत त्यांची मदत करण्यासाठी पुढे यायलं हवं. पहिल्यांदा त्यांना सहकार्य मिळायला हवं नंतर न्याय.”
BJP MP Varun Gandhi expresses his grief over #BalasoreTrainAccident; urges MPs to donate a part of their one-month salary to the bereaved families to help them. pic.twitter.com/DpnJgK0EKQ
— ANI (@ANI) June 3, 2023
बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोलकाता-चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहानागाजवळ रुळावरून घसरली. यानंतर कोरोमंडल टेल मालगाडीला धडकली.