मंदार, रितविझ,कार्तिक, नितेश, शैलेश आघाडीवर
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व सतीशअण्णा फॅन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ऑल इंडिया सतिशअण्णा चषक जलद बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या दिवशी पाचव्या फेरीअखेर मंदार लाड, रितविझ परब, कार्तिक साई, नितेश बेलूरकर, शैलेश आर. यांनी पाच गुणासह आघाडी मिळविली आहे.

महावीर भवन मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या ऑल इंडिया जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रिहान मुझावर, पुरस्कर्ते इम्रान तपकीर, प्रशांत अन्वेकर, बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष निलेश भंडारींसह आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी रोपट्याला पाणी घालून या ऑल इंडिया बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत जवळपास 250 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवसाअखेर जवळपास 60 हून अधिक स्पर्धकांनी पाचव्या फेरीअखेर अघाडी मिळविली होती. त्यामध्ये मंदार लाड (गोवा) 5 गुण, रितविझ परब (गोवा) 5 गुण, कार्तिक साई (हैद्राबाद) 5 गुण, नितीश बेलूरकर (गोवा) 5 गुण, शैलोश आर. (चेन्नई) 5 गुण, श्रीराज भोसले (रेंदल) 4.5 गुण, आर. आर. लक्ष्मण (आयसीएफ) 4.5 गुण, सम्मेद शेठ (कोल्हापूर) 4.5 गुण, किरण पंडीतराव (पुणे) 4.5 गुण, आशिष गांधी (कोल्हापूर) 4 गुण, बालकृष्ण ए. (म्हैसूर) 4 गुण, एम. जी. गहान (बेंगळूर) 4 गुण, मोहम्मद शैख (ठाणे) 4 गुण, बालसुब्रह्मण्यम रामनाथन (चेन्नई) 4 गुण, पी. आर. जॉनी (केरळ) 4 गुण, गिरीष बाचीकर (बेळगाव) 4 गुण, अभिषेक गानगेर (बेळगाव) 4 गुण यांच्यासह जवळपास 40 हून अधिक स्पर्धकांनी आघाडी मिळविली आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी स्पर्धकांच्या पुढील फेऱ्या खेळविण्यात येणार असून सायंकाळी बक्षीस वितरण होणार आहे.









