प्रतिनिधी /पणजी
फोन्ताईनस पणजी येथील ‘ग्लोबल टू लोकल’ स्टोअरच्या सहकार्याने सम्राट क्लब पणजीतर्फे एका आगळय़ा वेगळय़ा पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘पुरुमेताचे शाकाहारी-मांसाहारी लोणचे आणि शितपेये (सरबत)’ हा स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेत संपूर्ण गोव्यातील स्पर्धकांनी भाग घेतला.
‘रुच्चीक फेम’ अमिता नायक सलत्री आणि शिवानी शर्मा (हॉटेल व्यावसायिक) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. पणजी सम्राट क्लबच्या अध्यक्ष प्रेरणा पावसकर यांनी सर्वांचे स्वागत केले. आशा आरोंदेकर आणि आशा वेर्णेकर यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. सम्राटच्या सदस्य पूजा केंकरे यांनी कॉर्डिनेटर म्हणून काम पाहिले. आशा आरोंदेकर यांनी आभार मानले. दोन्ही परीक्षक तसेच प्रेरणा पावसकर आणि आशा आरोंदेकर यांच्याहस्ते सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे आणि भेटवस्तू देण्यात आली.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे ः 1) शाकाहारी लोणचे – मनीषा बोरकर (प्रथम), मृणाल नार्वेकर (द्वितीय), तेजा नागवेकर (तृतीय). 2) मांसाहारी लोणचे – प्रीती शेटय़े (प्रथम). 3) सरबत – बिंद्रा कामत तेली (प्रथम), शुब्बू नायर (द्वितीय), स्मृती पै (तृतीय).









