वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून नागपुरात पहिली कसोटी सुरू होणार असून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ ताकद पणाला लावणार आहेत. तथापि, मालिका सुरू होण्यापूर्वी, खेळपट्ट्यांबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे आणि सांगितले गेले आहे,
ऑस्ट्रेलियाच्या माजी यष्टीरक्षक इयान हिलीने म्हटले आहे की, भारताने योग्य खेळपट्ट्या तयार केल्यास पाहुणे मालिका जिंकतील.मात्र, खेळपट्टीवर केलेल्या वक्तव्यामुळे हिलीला अनेक वर्तमान आणि माजी क्रिकेटपटूंच्या टीकेचा फटका सहन करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठीच्या नागपूरच्या खेळपट्टीची झलक क्रिकेट

ऑस्ट्रेलियाने दाखविली आहे. क्रिकेट डॉट
कॉम ऑस्ट्रेलियाने दिलेला या छायाचित्रांमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीचे निरीक्षण करताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाला भारतातील परिस्थितीवर मात करण्याच्या बाबतीत नेहमीच संघर्ष करावा लागलेला आहे. त्यांचा या उपखंडातील शेवटचा मालिका विजय नोंदला गेल्यास आता अठरा वर्षे झाली आहेत. स्मिथने कबूल केले की, भारतता एक कसोटी मालिका सोडाच कसोटी सामनाही जिंकणे कठीण आहे, नागपुरातील पहिल्या कसोटीपूर्वी तो म्हणाला, ठजर आम्ही तो पर्वत सर करू शकलो, तर ती खूप मोठी कामगिरी ठरेल.. मला वाटते की, जर आम्ही भारतात जिंकू शकलो तर ते अॅशेस मालिकेपेक्षा मोठे असेल, असे मत त्याने व्यक्त केले. पाहुण्यांना सध्या दुखापतींचा प्रश्न सतावत आहे. मुख्य वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांचा त्यात समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया 2-1 ने जिंकू शकेल : ड्युमिनी
घरच्या मैदानांवर खेळत असल्याने बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेत भारताचे पारडे जड वाटत असले, तरी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जे. पी. ड्युमिनीने ऑस्ट्रेलिया यजमानांना 2-1 ने पराभूत करू शकेल, असे मत व्यक्त केले आहे. भारत रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या दोन प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणार आहे, तर अष्टपैलू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणार आहे. ‘माझ्या मते, ही एक अतिशय चुरसपूर्ण मालिका ठरेल, परंतु मला खरोखर वाटते की ऑस्ट्रेलियाला चांगली संधी आहे’, असे ड्युमिनीने म्हटले आहे.

तीन फिरकीपटू खेळविण्याचा मोह : राहुल
खेळपट्टीच्या स्वरूपाचा अंदाज लावणे कधीही सोपे नसते, परंतु गुऊवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पहिल्या कसोटीत तीन फिरकीपटू खेळविण्याचा मोह होत असल्याचे भारताचा कसोटी उपकर्णधार के. एल राहुलने मान्य केले आहे. राहुलने यष्टिरक्षक, तिसरा फिरकीपटू आणि पाचव्या क्रमांकावरील फलंदाज या संघातील तीन प्रमुख स्थानांबद्दल कोणतीही निश्चित उत्तरे दिली नाहीत. शुभमन गिल मधल्या फळीत फलंदाजी करेल का, असे विचारले असता राहुल म्हणाला की, आम्ही अद्याप अंतिम संघाबाबत निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय घेणे कठीण असेल. काही खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि काही स्थाने खुली आहेत. त्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि खेळाडूंशी बोलले जात आहे, असे त्याने सांगितले.
अश्विनचा फॉर्म ठरवेल भवितव्य : शास्त्री
रविचंद्रन अश्विनचा फॉर्म बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेचे भवितव्य ठरवेल, असे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. मात्र संघाच्या या प्रमुख फिरकी गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या आगामी चार सामन्यांच्या बाबतीत अतिप्रमाणात योजना आखू नयेत, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया – भारत कसोटी मालिकांच्या कडू – गोड आठवणीइंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेला मोठी परंपरा आहे पण भारत विऊद्ध ऑस्ट्रेलिया हे कसोटी सामनेही काही कमी चुरसपूर्ण ठरलेले नाहीत आणि कमी इर्षेने खेळले गेलेले नाहीत. कसोटी क्रिकेटच्या बाबतीत अॅशेस सर्वोत्तम असेल, तर बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेतही सर्वोत्तम स्तर गाठण्याची क्षमता आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैदानावरील वैर गेल्या 75 वर्षांत भरपूर वाढले आहे आणि रंगतदारही ठरलेले आहे. आता दोन्ही दिग्गज क्रिकेट संघांदरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका नागपुरातील लढतीने सुरू होत असून या पार्श्वभूमीवर भारतीय भूमीत आजवर झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकांतील महत्त्वाच्या आठवणींना उजाळा देणे रंजक ठरेल.
1969 : ‘सीसीआय स्टँड’मध्ये आग आणि दंगल
दुसऱ्या डावात 7 बाद 89 अशी स्थिती झालेल्या भारताला ब्र्रेबॉर्न स्टेडियमवरची ऑस्ट्रेलियाविऊद्धची पहिली कसोटी वाचवण्यासाठी चमत्काराची गरज होती. श्रीनिवास व्यंकटरघवन आणि अजित वाडेकर यांची चौथ्या दिवशी आठव्या यष्टीसाठीची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरत असताना पंच शंभू पान यांनी वेंकटरघवन यांचा झेल यष्टीरक्षकाने पकडल्याचा वादग्रस्त निर्णय दिल्यानंतर भडकलेल्या प्रेक्षकांनी खुर्च्या आणि शीतपेयाच्या बाटल्या फेकल्या तसेच आग लावली. प्रेक्षकांना पिटाळून लावले गेल्यानंतर भारताने दिवसाचा शेवट 9 बाद 125 धावांवर केला. पाचव्या दिवशी 64 धावांचे छोटे लक्ष्य समोर असलेल्या ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेताना आठ गडी राखून विजय मिळवला. पाहुण्यांनी पुढे मालिका 3-1 अशी जिंकली.
1986 : ‘टाय टेस्ट’ आणि पंच विक्रमराजूंचा निर्णय
मद्रासमधील ही कसोटी डीन जोन्सने अत्यंत उष्ण हवामानात 210 धावांची केलेली खेळी आणि पंच व्ही. विक्रमराजूच्या वादग्रस्त निर्णय यामुळे आठवणीत राहील. भारतासमोर 348 धावांचे आव्हान असताना डावखुरा फिरकी गोलंदाज रे ब्राइटने ऑस्ट्रेलियाला तीन बळी मिळवून पुन्हा विजयाची संधी प्राप्त करून दिली. रवी शास्त्री आणि मनिंदर सिंग ही शेवटची जोडी खेळपट्टीवर होती आणि त्यांना चार धावा काढायच्या होता. पण सामन्यात 10 बळी मिळविलेला ऑफस्पिनर ग्रेग मॅथ्यूजने मणिंदरला पायचीत केल्याचा वादग्रस्त निर्णय पंच विक्रमराजू यांनी दिल्याने कसोटी इतिहासात दुसऱ्यांदा सामना ‘टाय’ झाला. विक्रमराजू यांना पुन्हा एकदाही कसोटीत पंचगिरी करता आली नाही.&ं
2001 : हरभजन, लक्ष्मण यांची अद्वितीय कामगिरी
स्टीव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियाने सुऊवातीच्या कसोटीत 10 गडी राखून विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्याच्या मार्गावर होती. युवा हरभजन सिंगने हॅटट्रिकची नोंद केलेल्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 445 धावा केल्यानंतर यजमानांना 171 धावांवर गारद करून फॉलोऑन लागू केला. दुसऱ्या डावात 4 बाद 232 अशी स्थिती असताना व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी 376 धावांची भागीदारी केल्याने संघाने 7 बाद 657 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर 384 धावांचा पाठपुरावा करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 212 वर संपुष्टात आला. हरभजनने या सामन्यात 13 बळी घेतले.
2005 : गब्बासारखी नागपूरमध्ये खेळपट्टी
ऑस्ट्रेलियाला शेवटी अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली भारतात मालिका जिंकता आली. त्या मालिकेतील चार कसोटींपैकी नागपूरच्या सामन्याची सर्वाधिक चर्चा झाली. बेंगळुरूमधील विजयानिशी ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतल्याने आणि चेन्नईतील सामना अनिर्णित राहिल्याने पाहुण्यांना नागपुरात मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यात खेळपट्टीवर भरपूर गवत ठेवल्याने वेगवान गोलंदाज मॅकग्रा आणि जेसन गिलेस्पी यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. माजी कर्णधार सौरव गांगुली आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांनी दुखापतींमुळे या सामन्यातून माघार घेतली. खेळपट्टीवर गवत राखले गेल्याने त्यांनी माघार घेतल्याचे नंतर दावे झाले. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या कथित सूचनेनुसार क्युरेटरने गवत राखल्याने कर्णधार गांगुली यांनी माघार घेतल्याची धारणा काही ज्येष्ठ खेळाडूंचीही झाली.
ऑस्ट्रेलिया – भारत कसोटी इतिहास
एकूण सामने – 102
भारत विजयी – 30
ऑस्ट्रेलिया विजयी – 43
अनिर्णीत – 28
टाय – 1









