एकूण 49 अधिकृत तर तीन पर्यायी उमेदवार
फोंडा ; फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी होऊन सर्व 52 अर्ज ग्राह्या धरण्यात आले आहेत. 52 उमेदवारांपैकी तिघा उमेदवारांनी डमी म्हणजेच पर्यायी अर्ज भरले असून उर्वरित 49 उमेदवार अधिकृत आहेत. आज गुरुवार 20 रोजी दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. प्रभागवार उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.
शांतीनगर प्रभाग 1 : नंदकुमार पुंडलिक डांगी, तुषार उर्फ लवलेश तुळशीदास कवळेकर, ज्योती केशव कुलकर्णी, राजेंद्र नारायण नागवेकर व रॉय रवी नाईक. कुरतरकरनगर प्रभाग 2 : विरेंद्र ढवळीकर, राजेश सिनाय तळावलीकर. सांताव्रुज प्रभाग 3 (महिला राखीव) : शेरॉल डिसोझा, वेरोनिका सुकोरिना डायस, रिवा मारिया फर्नांडिस, ज्योती अरुण नाईक. यशवंतनगर तिस्क प्रभाग 4 : संदीप घाडी आमोणकर, नारायण मणेरीकर, चंद्रकला राम नाईक, सलोनी शांतो नाईक, व्यंकटेश अनंत नाईक. दाग प्रभाग 5 (ओबीसी राखीव) : सुशांत गुरुदास कवळेकर, रितेश रवी नाईक, श्रवण सत्यवान नाईक. खडपाबांध प्रभाग 6 : शौनक विनायक बोरकर, लेविया फर्नांडिस, मंगेश कुंडईकर, पद्मजा देवदत्त नाईक. सायमन आगियार व तोषिता कुंडईकर यांनी पर्यायी अर्ज भरले आहेत. खडपाबांध प्रभाग 7 : विश्वनाथ दिलीप दळवी, भारत पुरोहित. वारखंडे प्रभाग 8 (महिला राखीव) : प्रतिक्षा प्रदीप नाईक, सलोनी सुदेश नाईक, विद्या नितीन नाईक. कुरतरकरनगर, सदर, काझीवाडा प्रभाग 9 : निशांत मधुकर आर्सेकर, रुपक शंभू देसाई, विन्सेंत पॉल फर्नांडिस. दुर्गाभाट प्रभाग 10 (ओबीसी महिला राखीव) : दीपा शांताराम कोलवेकर, मनस्वी परेश मामलेदार, पूजा कुश नाईक. पंडितवाडा प्रभाग 11 (महिला राखीव) : प्रियांका नवनाथ शेट पारकर, शुभलक्ष्मी शैलेंद्र शिंक्रे, वेदिका विवेकानंद वळवईकर. सिल्वानगर, ज्योफिलनगर प्रभाग 12 : सांताना कार्दोज, विराज सप्रे, शिवानंद सावंत, अशित अशोक वेरेकर. दुर्गाभाट, सिल्वानगर प्रभाग 13 : दर्शना श्याम नाईक, विद्या पुनाळेकर. शांतीनगर, दुर्गाभाट, तळे प्रभाग 14 : अजय मामलेकर, आनंद नाईक, सूरज उर्फ अनिल नाईक, अजित पारकर. निधी मामलेकर यांनी पर्यायी अर्ज भरला आहे. शांतीनगर, सदर, दुर्गाभाट, वरचाबाजार प्रभाग 15 : संपदा किशोर नाईक, गीताली राजेश तळावलीकर.









