रत्नागिरी :
जिल्ह्यात सध्या पडत असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे जिल्हयातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. जिल्ह्यात असलेल्या ३ मध्यम तर ६५ लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात कमालीची वाढ झालेली आहे. सध्या जिल्ह्यातील ६८ वरणांपैकी २८ बरणे १०० टक्के भरली असून २८ धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याचा अहवाल रत्नागिरी पाटबंधारे मंडळाकडून देण्यात आला आहे.
मे महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये खालावलेली पाणीपातळी कमालीची वाढली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांनाही त्यातून दिलासा मिळाला. जिल्ह्यातील ६८ घरणांपैकी २८ धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामध्ये मंडणगडातील ३. दापोली तालुक्यातील ३. खेडमधील ३, गुहागरमधील १, चिपळुणात ६. संगमेश्वरात ३, रत्नागिरातील १, लांजा ४, राजापूरमधील ४ धरणांचा समावेश आहे. तर २८ धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ३०५.५३ द.ल घ.मी. पाणीसाठा झाला असून त्याची टक्केवारी ६८.४८ इतकी आहे.
- गडनदी धरणात ८० टक्के पाणी
तीन मध्यम प्रकल्प असलेल्या खेडमधील नातुवाडी घरण ६३.२१ टक्के, संगमेश्वरमधील गडनदी ८०.८२ टक्के तर राजापूरमधील अर्जुना घरण ६३.५५ टक्के भरले आहे.
- जिल्ह्यातील १०० टक्के भरलेली धरणे
▶ मंडणगड-पणदेरी, चिंचाळी, तिडे
▶ दापोली-सोंडेघर, पंचनदी
▶ खेड-शिरवली, शेलडी, कोंडीवली,
▶ गुहागर-गुहागर
▶ चिपळूण-फणसवाडी, मालघर, अडरे, खोपड, मोरवणे, आंबतखोल संगमेश्वर-तेलेवाडी, कडवई, रांगव
▶ रत्नागिरी – शीळ लांजा-व्हेळ, वेणी, इंदवटी, हर्दखळे राजापूर बारेवाडी, ओझर, गोपाळवाडी, वाटूळ
- ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेली धरणे
मंडणगड तुळशी, दापोली शिरसाडी, आवाशी, टांगर खेड नातुवाडी म.प्र., शेलारवाडी, पिंपळवाडी, तळवट, गुहागर-पिंपर, चिपळूण असुर्डे संगमेश्वर-साखरपा, निवे, गडनदी, गडगडी लांजा-शिपोशी, गवाणे, झापडे, केळंबा, मुचकुंदी, हर्दखळे, कुवे राजापूर अर्जुना म. प्रकल्प, कशेळी, दिवाळवाडी, चिंचवाडी, काकेवाडी, जुवाठी.








