वृत्तसंस्था / रेमोना (अमेरिका)
लिथुनियाचा पुरुष अॅथलिट मिकोलास अल्केनाने येथे झालेल्या ओकलाहोमा थ्रोज सिरीज विश्व निमंत्रितांच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत थाळीफेक प्रकारात नवा विश्वविक्रम नोंदविला.
लिथुनियाच्या अल्केनाने थाळीफेक प्रकारात यापूर्वी स्वत:च दोनवेळा विश्वविक्रम केला होता. पण रेमोनातील स्पर्धेत त्याने स्वत:चाच विश्वविक्रम मोडीत काढला. रविवारी या स्पर्धेत अल्केनाने 75.56 मी.ची थाळीफेक करत नवा विश्वविक्रम केला. 1986 पासून याक्रीडा प्रकारात अबाधित राहिलेला विश्वविक्रम अल्केनाने गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत मागे टाकला होता. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अल्केनाने रौप्य पदक मिळविले होते.









