आलिया भट्ट अन् वरुण धवन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियां’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ यासारख्या चित्रपटांमधील वरुण अन् आलियाची ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीला मोठी पसंती मिळाली होती. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते. आता याचा सीक्वेल येण्याची शक्यता आहे. दुल्हनियाच्या सीक्वेलवर आम्ही सर्वांनी एक टीम म्हणून विस्तृत चर्चा केली आहे. आम्ही निश्चितपणे हे करू इच्छितो. तसेच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही यावर काम करत आहोत, असे वरुण धवनने सांगितले आहे. दिग्दर्शक शशांक खेतान यावर काम करत आहे. तो एक पटकथा तयार करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही परस्परांसोबत पुन्हा काम करणे पसंत करू असे वरुणने म्हटले आहे. वरुण धवन अलिकडेच जान्हवी कपूरसोबत ‘बवाल’ चित्रपटात दिसून आला होता. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. तर दुसरीकडे आलिया ही ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 2012 मध्ये वरुण आणि आलियाने ‘स्टुडंट ऑफ द ईयर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्रानेही पदार्पण केले होते.









