सत्या नडेला, अजय बंगा यांचाही समावेश
वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
टाईम मासिकाने नुकतीच जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, कुस्तीपटू साक्षी मलिक, जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि अभिनेता-दिग्दर्शक देव पटेल यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत अमेरिकेच्या एनर्जी लोन कार्यक्रम कार्यालयाचे संचालक जिगर शाह, येल विद्यापीठातील खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक प्रियमवदा नटराजन यांचाही समावेश आहे. याशिवाय भारतीय वंशाच्या रेस्टॉरंटच्या मालक अस्मा खान आणि दिवंगत रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांच्या पत्नी युलिया नवलनाया यांनाही स्थान देण्यात आले आहे.









