सप्टेंबरमध्ये सुरू होणार प्री-वेडिंग बॅश
बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि ऋचा चड्ढा हे 7 वर्षे परस्परांना डेट केल्यावर ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. तर या जोडप्याचा प्री-वेडिंग बॅश चालू महिन्यातच सुरू होणार आहे.
अली अन् ऋचा हे 6 ऑक्टोबर रोजी विवाहबद्ध होणार आहेत. 7 ऑक्टोबर रोजी मुंबईत दोघांकडून रिसेप्शनचे आयोजन केले जाईल. तर अली-ऋचाचा प्री-वेडिंग बॅश दिल्लीत 30 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत पार पडणार आहे. विवाहात ऋचा 4 फॅशन डिझायनरनी तयार केलेले ड्रेस घालणार आहे.
ऋचा अन् अली यांची पहिली भेट 2012 मध्ये फुकरे या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ऋचानेच अलीला प्रपोज केले होते. ऋचाच्या प्रपोजलला उत्तर देण्यासाठी अलीने तीन महिन्यांचा कालावधी घेतला होता. दोघांनी स्वतःचे रिलेशनशिप सुमारे 5 वर्षांपर्यंत गुप्त ठेवले होते. दोघांनी स्वतःच्या प्रेमसंबंधांची व्हिक्टोरिया अँड अब्दुल या चित्रपटाच्या प्रीमियरप्रसंगी जाहीर कबुली दिली होती.









