वेबसीरिजमध्ये दिसणार नवी जोडी
अभिनेता अली फझल अलिकडेच एका मुलीचा पिता झाला आहे. तर दुसरीकडे मिर्झापूर 3 मधील गुड्डू पंडित या व्यक्तिरेखेसाठी त्याला पुन्हा एकदा प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. अली फझलची मिर्झापूर सीरिजनंतर प्रचंड लोकप्रियता वाढली आहे. अली आता दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभसोबत रोमांस करताना दिसून येणार आहे.
राज आणि डीके यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या सीरिजमध्ये अली आणि समांथा मुख्य भूमिका साकारणार आहे. या सीरिजचे नाव ‘रक्त ब्रह्मांड’ असेल आणि याचे 6 एपिसोड्स असणा आहेत. याचे चित्रिकरण मुंबईत सुरू होणार आहे. या सीरिजचे चित्रिकरण ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे. या सीरिजमध्ये अली अत्यंत वेगळ्या प्रकारची भूमिका साकारणार असल्याचे समजते.
अली फझल याचबरोबर अनुराग बासू यांच्या ‘मेट्रो इन दिनों’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर हे कलाकारही दिसून येतील. याचबरोबर अली हा आमिर खान प्रॉडक्शन्सकडून निर्मित होणाऱ्या ‘लाहौर 1947’ आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘ठग लाइफ’मध्ये काम करत आहे.









