वृत्तसंस्था/ ऍमस्टरडॅम (हॉलंड)
रविवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील लिबेमा महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सातव्या मानांकित इक्टेरिना ऍलेक्सेंड्रोव्हाने एकेरीचे जेतेपद मिळविताना टॉप सीडेड सबालेंकाचा पराभव केला.
ग्रासकोर्टवरील स्पर्धेत ऍलेक्सेंड्रोव्हाने पहिल्यांदाच अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. अंतिम सामन्यात ऍलेक्सेंड्रोव्हाने सबालेंकाचा 7-5, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. ऍलेक्सेंड्रोव्हाने या सामन्यात शेवटच्या 12 पैकी 11 गेम्स जिंकून जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. ऍलेक्सेंड्रोव्हाने या स्पर्धेत येस्ट्रेमेस्का, कॅलिनिना, मॅक्नेली आणि कुड्रेमेटोव्हा यांचा पराभव करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.









