वृत्तसंस्था/ युमेग (क्रोएशिया)
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या क्रोएशिया खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्सी पॉपिरीनने एकेरीचे जेतेपद मिळविताना स्वीसच्या वावरिंकाचा पराभव केला. एटीपी टूरवरील ही स्पर्धा 250 दर्जाची आहे.
अंतिम सामन्यात पॉपिरीनने वावरिंकाचा 6-7 (5-7), 6-3, 6-4 असा पराभव केला. हा सामना अडीच तास चालला होता. दोन्ही खेळाडूंकडून दर्जेदार खेळाचे दर्शन घडले. वावरिंकाने पहिला टायब्रेकरमधील सेट जिंकून पॉपिरीनवर आघाडी मिळविली होती. त्यानंतर पॉपिरीनने पुढील सलग दोन सेटस् जिंकून वावरिंकाचे आव्हान संपुष्टात आणले.









