कृष्णा नदीच्या पातळीत मोठी वाढ : पूरस्थितीची जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुखांकडून पाहणी : कोयनेसह 4 धरणांतून विसर्ग सुरू
वार्ताहर /एकसंबा
पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी व मुसळधार पाऊस होत असल्याने वेदगंगा, दूधगंगा व कृष्णा नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी येत आहे. वाढती पाणीपातळी लक्षात घेता बुधवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील व इतर अधिकाऱयांनी मांजरी, जुगुळ, मंगावती, कुडची येथे भेट देऊन कृष्णा नदीची पाहणी केली. तसेच तालुका अधिकाऱयांशी संवाद साधला. दरम्यान, वाढत्या पाणीपातळीमुळे चिकोडी व निपाणी तालुक्मयांतील नदीकाठच्या 34 गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी कल्लोळ येथे कृष्णा नदीचा प्रवाह मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. तसेच कल्लोळ कृष्णाकाठावरील दत्त मंदिरास पाण्याचा विळखा बसला आहे.
रोजची वाढती पाणीपातळी लक्षात घेता दूधगंगा व कृष्णा नदीच्या पात्रात दोन ते तीन फुटांनी वाढ होत आहे. बुधवारीदेखील तेच चित्र पहावयास मिळाले. दूधगंगा नदीची धोकापातळी 538 मीटर असून बुधवारची पाणीपातळी 535.02 मीटर इतकी होती. तर कृष्णा नदीची धोकापातळी 537 मीटर असून बुधवारची पाणीपातळी 531.21 मीटर इतकी होती. पावसाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास दूधगंगा नदीवरील एकसंबा-दानवाड पुलावर पाणी येऊन आंतरराज्य वाहतूक बंद होऊ शकते. परिणामी, अगदी नदीजवळ राहणाऱया नागरिकांनी आपले साहित्य बांधण्यास सुरुवात केली असून तसे आदेशही स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.
दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत दीड ते दोन मीटरने वाढ झाल्यास पाणी पात्राबाहेर जाऊन पूरजन्यस्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे. बुधवारी दूधगंगा नदीत 2 हजार 640 क्मयुसेकने प्रवाहात वाढ झाली असून 23 हजार 760 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. राजापूर बंधाऱयातून 10 हजार 625 क्मयुसेकने विसर्ग वाढला असून तो 88 हजार 500 क्मयुसेक झाला आहे. एकूण कल्लोळ कृष्णा नदीपात्रात 13 हजार 265 क्मयुसेक पाण्याची आवक वाढली असून 1 लाख 12 हजार 260 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग होत होता.
पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहता कोयना 123 मि.मी, वारणा 87 मि.मी, काळम्मावाडी 96 मि.मी, नवजा 142 मि.मी, राधानगरी 126 मि.मी, महाबळेश्वर 136 मि.मी, पाटगावमध्ये 167 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कायम असून धरणात 40 हजार 962 क्मयुसेक पाण्याची आवक होत आहे. वाढती पाणीपातळी लक्षात घेता कोयना धरण व्यवस्थापन अधिकाऱयांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून कोयना धरण पायथा विद्युतगृहातून 1,050 क्मयुसेकचा विसर्ग सुरू केला आहे.
तसेच राधानगरी 1350 क्मयुसेक, वारणा 829 क्मयुसेक तर काळम्मावाडी धरणातून 700 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हिप्परगीची पाणीपातळी 521.50 मीटर असून 1 लाख 3 हजार क्मयुसेकने पाण्याची आवक होत असून 1 लाख 2 हजार क्मयुसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
आलमट्टीचा विसर्ग दीड लाख क्युसेक करा…
आलमट्टी धरणाची पाणीपातळी 517.32 मीटर असून 88.503 टीएमसी पाणीसाठा आहे. 1 लाख 4 हजार 305 क्मयुसेक पाण्याची आवक होत असून 1 लाख 25 हजार क्मयुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन आलमट्टी धरणातून 1 लाख क्मयुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. पण, पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने बुधवारी दुपारी 3 वाजल्यापासून आलमट्टी धरणातून 25 हजार क्मयुसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने पावसाव्यतिरिक्त कोयना धरणासह इतर धरणांतूनही काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नद्यांची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्मयता आहे. यामुळे आलमट्टीचा विसर्ग दीड लाख क्मयुसेक करण्याची गरज व्यक्त केली आहे.
राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ
तुडये : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयाच्या परिसरात दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी जलाशय पाणीपातळी 2466.70 फूट नोंद झाली. तर परिसरात आतापर्यंत 821.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मागीलवर्षी 13 जुलै रोजी पाणीपातळी 2469.80 फूट होती. मागील वर्षापेक्षा तीन फुटाने पाणीपातळी कमी आहे. दिवसभरातील पावसामुळे बुधवारी जलाशयात एक फूट पाण्याची वाढ होत सायंकाळी पाणीपातळी 2467.80 फूट झाली. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 8 फूट पाण्याची आवश्यकता आहे. जलाशयाला मिळणाऱया जांभूळ ओहळ, नाला दुथडी भरून वाहू लागला आहे. जलाशयाला मिळणारे सर्वच नाले आता तुडुंब भरून वाहू लागले आहेत.