वृत्तसंस्था/ टोरँटो (कॅनडा)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या टॉमी पॉलने स्पेनच्या टॉपसिडेड कार्लोस अॅलकॅरेझचा तर ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरने रशियाच्या मेदव्हेदेवचा पराभव करत एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे.
या स्पर्धेतील झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टॉमी पॉलने अॅलकॅरेझचा 6-3, 4-6, 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. टॉमी पॉलने अॅलकॅरेझची सलग चौदा सामन्यातील विजयी घोडदौड रोखली. दुसऱ्या एका सामन्यात ऑस्ट्रेलिया अॅलेक्स डी मिनॉरने रशियाच्या द्वितीय मानांकीत मेदव्हेदेवचा 7-6 (7-5), 7-5 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली. 2021 साली मेदव्हेदेवने ही स्पर्धा जिंकली होती. अन्य एका सामन्यात स्पेनच्या फोकीनाने अमेरिकेच्या मॅकडोनॉल्डचा 6-4, 6-2 असा फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले.









