वृत्तसंस्था/ बेसिल
एटीपी टूवरील येथे सुरू झालेल्या स्विस इनडोअर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस ऍल्कॅरेझने एकेरीत विजयी सलामी देताना ब्रिटनच्या जॅक ड्रेपरचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ऍल्कॅरेझने ड्रेपरवर 3-6, 6-2, 7-5 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या लढतीमध्ये ऍल्कॅरेझला पहिला सेट गमवावा लागला. त्यानंतर त्याने पुढील दोन सेट्स जिंकून ड्रेपरचे आव्हान संपुष्टात आणले. मात्र, ड्रेपरने ऍल्कॅरेझला विजयासाठी चांगलेच झुंजविले.









