वृत्तसंस्था/ पॅरीस
येथे सुरू असलल्या हॉपमन चषक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत स्पेन आणि क्रोएशिया यांच्यातील झालेल्या लढतीत स्पेनच्या अल्कारेझने क्रोएशियाच्या कोरिकचा पराभव केला पण स्पेनला या स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली नाही. आता या स्पर्धेत क्रोएशिया आणि स्वीत्झर्लंड यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
स्पेनचा टॉप सिडेड अल्कारेझने क्रोएशियाच्या कोरिकचा 6-3, 6-7 (6-8), 10-5 असा पराभव केला. तथापि स्पेनच्या मॅसेरोव्हाला कोएशियाच्या व्हेकीकने 6-2, 6-1 असे पराभूत केल्याने स्पेनचे आव्हान संपुष्टात आले. स्पेनला या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी क्रोएशियाचा 3-0 असा पराभव करणे जरुरीचे होते पण त्यांना ते साध्य झाले नाही.