वृत्तसंस्था/ माद्रिद
येथे सुरु असलेल्या माद्रिद खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सिडेड आणि या स्पर्धेतील विद्यमान विजेता कार्लोस अलकॅरेझने एकेरीची अंतिम फेरी गाठत आपला 20 वा वाढदिवस साजरा केला.
या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात अलकॅरेझने झेकच्या कोरीकचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. 2023 च्या टेनिस हंगामात अलकॅरेझ आता चौथी टेनिस स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. चालू वर्षामध्ये अलकॅरेझने 30 पैकी 28 सामने जिंकले आहेत.









