वृत्तसंस्था/ बीजिंग
स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने निर्णायक टायब्रेकरमध्ये सलग सात गुण घेत अव्वल मानांकित जेनिक सिनेरचा पराभव करून येथे झालेल्या चायना ओपन सुपर 1000 स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सिनेरविरुद्ध झालेली त्याची ही तिसरी लढत असून तिन्ही लढती अल्कारेझनेचे जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
जेतेपदासाठी झालेल्या लढतीत अल्कारेझने सिनेरवर 6-7 (6-8), 6-4, 7-6 (7-3) अशी मात केली. हा सामना सुमारे साडेतीन तास चालला होता. या स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात दीर्घ काळ चाललेला सामना होता. अल्कारेझला तिसरे मानांकन मिळाले होते. त्याने सिनेरची चौदा सामन्यांची विजयी मालिका खंडित करीत सलग तिसरी ट्रॉफी जिंकण्यापासून दूर ठेवले. सिनेरने याआधी सिनसिनॅटी व यूएस ओपन स्पर्धा जिंकल्या आहेत. सिनेर हा येथील विद्यमान विजेता होता.









