वृत्तसंस्था/ रोटरडॅम
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या रोटरडॅम खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने एकेरीची उपांत्यफेरी गाठताना आपल्याच देशाच्या मार्टिनेझचा पराभव केला. अल्कारेझ आणि पोलंडचा हुरकेझ यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अल्कारेझने मार्टिनेझचा 6-2, 6-1 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. अन्य एका सामन्यात इटलीच्या बेलुसीने ग्रिसच्या बाराव्या मानांकित सित्सिपसचा 6-2, 6-2 असा फडशा पाडत शेवटच्या सहा खेळाडूंत स्थान मिळविले.









