वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात रशियाच्या आंद्रे रूबलेव्हला स्पेनचा नवोदित टॉप सिडेड टेनिसपटू कार्लोस अॅल्कारेझकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात द्वितीय मानांकीत अॅल्कारेझने रूबलेव्हचा 7-5, 6-2 अशा सरळ सेटसमध्ये पराभव केला. रेड गटातील खेळविण्यात आलेल्या या सामन्यात रूबलेव्हने पहिल्या सेटमध्ये अॅल्कारेझला चांगलेच झुंजवले. पण दुसऱ्या सेटमध्ये अॅल्कारेझने आपल्या अचूक सर्व्हिस आणि बेसलाईन खेळाच्या जोरावर रूबलेव्हचा पराभव केला. या स्पर्धेतील राऊंड रॉबिन पद्धतीच्या सुरूवाच्या सामन्यात अॅल्कारेझला जर्मनीच्या व्हेरेव्हकडून हार पत्करावी लागली होती. आता या स्पर्धेत अॅल्कारेझचा पुढील सामना रशियाच्या मेदव्हेदेवशी होणार आहे.









