Vaibhav Mangale : ‘अलबत्या गलबत्या’या प्रसिध्द बालनाट्यातून चिंचि चेटकिणीची भूमिका साकारणारे अभिनेते वैभव मांगले यांनी या नाटकातून एक्झिट घेतली आहे. याबबात त्यांनी फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. मी चिंचि चेटकीणीचं काम सोडलं आहे. आता‘ती मी नाहीच’ अशा आशयाची पोस्ट मांगले यांनी शेअर केली आहे. आता वैभव मांगले यांच्याऐवजी अभिनेता निलेश गोपनारायण ‘चिंचि चेटकिणी’ची भूमिका साकारणार आहेत. वैभव मांगले यांनी या नाटकाचा निरोप घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, निर्माते राहुल भंडारे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले वैभव मांगले?
प्रिय रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो मैत्रिणींनो मी चिंचि चेटकीणीच काम सोडलं आहे . तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पाहायला याल आणि भ्रमनिरास होईल. तर सांगायचा मुद्दा हा आहे कि “ती मी नव्हेच !!”अशी पोस्ट शेअर करत त्यांनी निलेश गोपनारायण आणि स्वत:चा चिंचि चेटकिणीच्या भूमिकेतील फोटो शेअर केले आहेत.
निर्माते राहुल भंडारे यांचे स्पष्टीकरण
या नाटकाने बालरंगभूमीला एक नवीन ऊर्जा मिळवून दिली आहे. आजवर या नाटकाचे विश्वविक्रमी प्रयोग झाले. मात्र, सध्या अभिनेते वैभव मांगले यांच्याकडे इतरही अनके प्रोजेक्ट आहेत. पण, हे नाटक चिमुकल्या प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे, त्यामुळे यात कोणताही खंड पडू नये, असे आम्हाला वाटले. केवळ, चिंचिची ही विश्वविक्रमी घौडदौड अशीच सुरु राहावी, यासाठी नव्या अभिनेत्याचा विचार करण्यात आला आहे. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









