वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने सौंदत्ती येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये अलतगे येथील श्री ब्रह्मलिंगेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या खो-खो संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच या संघातील तीन विद्यार्थिनींची विभागीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात साहिली चौगुले, संचिता पाटील, समीक्षा पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. या संघाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन तर शाळा सुधारणा कमिटी व ग्रामस्थांचे प्रोत्साहन मिळत आहे









