प्रतिनिधी/; कराड
दिवाळीचा दिवस… अभ्यंगस्नान करून, नवीन कपडे घालून, नटूनथटून रसिक प्रेक्षागृहात दाखल होतात. सर्वांना उत्सुकता असते ‘दिवाळी पहाट’ची. दिवाळी म्हटली, की आनंद उत्साह आणि जल्लोष सर्वत्र नाविन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई! प्रसन्नतेचे प्रतीक म्हणून असलेल्या दीपोत्सवाचे आगमन हे स्वरांनी झाले तर बातच न्यारी. वसुबारस धनत्रयोदशीपासून दीपोत्सवास सुरुवात झाली की ठिकठिकाणी संगीताच्या मैफिलींना संपूर्ण शहरातील सांगीतिक बैठकीचे अधिष्ठान प्रदान होते. वस्त्यावस्त्यांमध्ये दिवाळी पहाट आणि संध्येचे कार्यक्रम उत्साहात पार पाडले जातात. दरवर्षी संपूर्ण भारतभर दिवाळीनिमित्त हेच दृश्य पहावयास मिळते.
भारतामध्ये दिवाळी पहाट साजरी होत असताना आपले आप्तेष्ट, नातेवाईक मित्रमंडळी जे नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त परदेशात वास्तव्यास आहेत आणि भारतामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी येऊ शकत नाहीत अशी सर्व मंडळी हे दिवाळी पहाटचे कार्यक्रम आपल्या भारतामधील नातेवाईकांच्या मदतीने ऑनलाइन दिवाळी पहाटचा आनंद घेतात. यावर्षी अमेरिकेमधील वास्तव्यास असणाऱया त्यांच्या भारतीय नातेवाईक व मित्रमंडळींसाठी स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या संचालिका आलापिनी सागर जोशी यांच्या मैफिलीने 24 ऑक्टोबर रोजी अमेरिकेमध्ये दिवाळी पहाटचे स्वर निनादले आणि भारतामधील त्यांचे नातेवाईक व मित्रांनी ही दिवाळी पहाट भारतीय वेळेनुसार 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता ऑनलाइन अनुभवली.
अमेरिकेमधील मॉरिसव्हिल या गावातील या दिवाळीला आलापिनी जोशी यांनी शास्त्राrय संगीत (राग मिया की तोडी), उपशास्त्राrय संगीत (ठुमरी मिश्र खमाज व मारू बिहाग) व गझल, अभंग इ. सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. सकाळी सातला चालू झालेली ही मैफल तीन तास रंगली. श्री. माधव व रमा मांजरेकर यांच्या पुढाकाराने तौर्य प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी शास्त्राrय गायिका आलापिनी जोशी यांना हार्मोनियम साथ सुजीत फणसे, तबलासाथ प्रथमेश देशपांडे व टाळसाथ विद्वत् ठकार यांनी केली.या संपूर्ण दिवाळी पहाट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुबोध यांनी अतिशय सुंदररित्या केले.








