हलगा येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा केला होता देखावा
वार्ताहर /किणये
गेल्या दोन महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त बनला आहे. पावसाअभावी पिके सुकून गेली आहेत. दसरा व दिवाळीचा सण आला सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. मात्र शेतकरी हतबल झाला आहे. आला दसरा अन् दिवाळी गुढी उभारावी कशी ? याची चिंता बळीराजाला लागली आहे. हलगा गावातील लक्ष्मी गल्लीतील गणेश तरुण युकव मंडळाने गुरुवारी दुर्गामाता दौडप्रसंगी बळीराजाची व्यथा मांडणारा देखावा सादर केला आहे. या देखाव्यामध्ये सध्या शिवारात सुकून गेलेले भातपीक लावण्यात आले आहे. शिवारात बहरून आलेली पिके वाळून गेलेली आहेत. यामुळे सर्व शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. तालुक्यातील भात पिके पूर्णत: सुकून गेली आहेत यामुळे त्यांना भातपीक मिळणार नाही त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. रताळी, सोयाबीन आधी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तो देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.









