वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कार्यालयाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) म्हणजेच सचिवालयाला हा धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सुरक्षाविषयक आवश्यक सतर्कता घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय बॉम्बने उडवण्याचा इशारा ई-मेल द्वारे देण्यात आला आहे. सदर ई-मेलमध्ये दहशतवादी संघटना ‘अल कायदा’ अशी नोंदही दिसून येत आहे. पोलिसांनी मुख्यमंत्री कार्यालयाला अतिरिक्त सुरक्षा पुरविली आहे. तसेच एटीएसनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी सचिवालय पोलीस ठाण्यात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीविऊद्ध आयटी कायद्याच्या कलम 351 (4), (3) आणि 66 (एफ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.









