सत्य घटनेवर आधारित असणार चित्रपट
अक्षयचा अलिकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट सम्राट पृथ्वीराज बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवू शकलेला नाही. अशा स्थितीत आता अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. एका मागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होत असतानाही अक्षयने स्वतःच्या कामातून ब्रेक घेतलेला नाही. आता लवकरच तो पुढील चित्रपट ‘कॅप्सूल गिल’चे चित्रिकरण सुरू करणार आहे.

या चित्रपटाकरता तो लवकरच ब्रिटनसाठी रवाना होणार आहे. हा चित्रपट बायोपिक असून यात मुख्य खाण अभियंते (माइनिंग इंजिनियर) जसवंत गिल यांच्या आयुष्याची कहाणी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. गिल यांनी बचाव मोहिमेद्वारे 60 हून अधिक मुलांचा जीव वाचविला होता. 1989 मध्ये पश्चिम बंगालच्या रानीगंज येथील कोळसा खाणीत पुराचे पाणी शिरल्याने 60 हून अधिक मुले त्यात अडकली होती. जसवंत गिल यांनी स्वतःच्या टीमसोबत मिळून त्यांना वाचविले होते. गिल हे त्यावेण कोल इंडिया लिमिटेडमध्ये इंजिनियर होते.
अक्षयसोबत या चित्रपटात परिणीति चोप्रा दिसून येणार आहे. यात ती जसवंत गिल यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. परिणीति या चित्रपटाच्या चित्रिकरणात सप्टेंबरपासून भाग घेणार आहे. तर अक्षय जुलै महिन्यात या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण करून ‘रक्षाबंधन’च्या प्रमोशनमध्ये सामील होणार आहे.









