अक्षय कुमार आणि रविना टंडन यांच्या प्रेमाचे किस्से एकेकाळी अत्यंत गाजले होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अचानकपणे दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या. दोघांमध्ये मोठी कटूता निर्माण झाली होती. परंतु अलिकडेच रविनाने अक्षय कुमारचे कौतुक केले होते. अशा स्थितीत आता दोघेही मोठ्या पडद्यावर एकत्र दिसून येणार असल्याचे समजते.

रविनाने अक्षयला बॉलिवूडचा सर्वात मजबूत स्तंभ ठरविले आहे. वैयक्तिक आयुष्यातील दोघांमधील मतभेद दूर झाले असले तरीही प्रोफेशनल लाइमध्ये या दोघांना दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून एकत्र पाहिले गेले नाही. परंतु आता दोघेही लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसून येणार आहेत. ‘वेलकम 3’ या चित्रपटात दोघेही एकत्र काम करणार ओत. या चित्रपटाचे नाव ‘वेलकम टू द जंगल’ असून यात संजय दत्त, अर्शद वारसी, सुनील शेट्टी, दिशा पाटनी आणि जॅकलीन फर्नांडिस हे कलाकारही दिसून येतील. रवीनाने काही काळापूर्वी ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिपटिप बरसा पानी..’ गाण्याचा उल्लेख केला होता. या गाण्यात ती अक्षयसोबत दिसून आली होती.









