जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिले नियुक्तीपत्र
न्हावेली / वार्ताहर
शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखपदी न्हावेली येथील उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची निवड करण्यात आली.याबाबतचे पत्र जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.श्री.पार्सेकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता.न्हावेली गावातून ते बिनविरोध निवडून आले होते.त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे.त्यांच्याकडे मोठी युवक संघटना आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही संधी देण्यात आली आहे. यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे,माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी,गुरु सावंत,राज धवण,नवनाथ पार्सेकर,विठ्ठल परब,तुकाराम पार्सेकर,अमोल पार्सेकर,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









