सोनू निगम-एआर रहमाननी मने जिंकली, आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा धडाक्यात प्रारंभ
वृत्तसंस्था/ चेन्नई
आयपीएलच्या 17 व्या मोसमाच्या रंगारंग कार्यकमाची जोरदार सुरुवात झाली आहे. बॉलिवूड कलाकार आणि गीतकारांनी दणक्यात सुरुवात केली. आधी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या दोघांनी जोरदार सुरुवात केली. त्यानंतर सोनू निगम आणि एआर रहमान या दोघांनी विविध गाण्यांनी मनं जिंकली. सलामीच्या सामन्याआधी होणाऱ्या या ओपनिंग सेरेमनीसाठी एमए चिदंबरम स्टेडियमबाहेर चाहत्यांनी एकच गर्दी केल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले. यावेळी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, आयपीएल अरुण धुमल, राजीव शुक्ला उपस्थित होते. ओपनिंग झाल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. दरम्यान, टीम इंडियाचे माजी खेळाडू नवज्योत सिंग सिद्धू यांचे कॉमेंटेटर म्हणून पुन्हा एकदा कमबॅक झालं आहे. ब्रॉडकास्टर्सच्या खास कार्यक्रमात सिद्धू यांची एन्ट्री झाली. यावेळी सिद्धू यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात शायरीने सुरुवात केली.









