लंडनमध्ये सुरू केले नव्या चित्रपटाचे चित्रिकरण
अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात बिझी अभिनेत्यांपैकी एक आहे. एका वर्षात त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. अलिकडेच तो ‘मिशन रानीगंज’मध्ये दिसून आला होता. हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नसला तरीही त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. अक्षयने याचदरम्यान नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे.
‘खेल खेल में’ या चित्रपटाचे चित्रिकरण लंडन येथे सुरू झाले आहे. अक्षयने सोशल मीडियावर यासंबंधी माहिती दिली आहे. ‘जेव्हा कॅमेरा वळतो, तेव्हा मी हास्याशिवाय राहू शकत नाही’ असे त्याने म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज करत असल्याचे समजते. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात तापसी पन्नू, वाणी कपूर, आदित्य सील आणि एमी विर्क हे कलाकार दिसून येणार आहेत.
अक्षय याचबरोबर ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत दिसून येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनना तयार या चित्रपटाचे चित्रिकरण स्कॉटलंड, लंडन, भारत तसेच संयुक्त अरब अमिरातमध्ये पार पडले आहे. अक्षयकडे याचबरोबर ‘वेलकम 3’, ‘सिंघम अगेन’ आणि ‘हाउसफुल 5’ यासारखे बिगबजेट चित्रपट आहेत.









