‘जॉली एलएलबी 3’मध्ये येणार आमने-समाने
‘जॉली एलएलबी’ आणि ‘जॉली एलएलबी 2’च्या यशानंर आता चित्रपटाचे निर्माते याचा तिसरा भाग आणण्याची तयारी करत आहे. चित्रपटाच्या तिसऱया भागात पहिल्या चित्रपटातील जॉली अरशद वारसी आणि दुसऱया चित्रपटातील जॉली अक्षय कुमारला एकत्र आणण्याची तयारी केली जात आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये न्यायाधीशाची भूमिका साकारणारे सौरभ शुक्ला तिसऱया भागात दिसून येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुभाष कपूर, अक्षय कुमार आणि अरशद वारसी मागील काही काळापासून ‘जॉली एलएलबी 3’ वर काम करत आहेत. न्यायालयीन वाद-युक्तिवादाची पार्श्वभूमी एक मजेशीर विषय सादर केला जाणार असल्याचे समजते.
न्यायालयातील घडामोडींना मोठय़ा पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न केला जणार आहे. नव्या चित्रपटात ड्रामा, थ्रिलपासून कॉमेडीपर्यंतचे अनेक पैलू यात असतील. सध्या पटकथेला अंतिम स्वरुप देण्यात येत आहे. त्यानंतर टीम निर्मितीपूर्व प्रक्रिया सुरू करणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित करण्याची तयारी केली जात आहे. या चित्रपटात अक्षय अन् अरशद दोघांनाही समान दर्जाची भूमिका मिळणार आहे. अक्षय अन् अरशद यापूर्वी ‘जानी दुश्मन ः एक अनोखी कहानी’ आणि ‘बच्चन पांडे’ या चित्रपटांमध्ये एकत्र दिसून आले होते.









