मेष
या आठवड्यात टारोटच्या प्रभावाने मेष राशीच्या जातकांना नवे निर्णय घ्यावे लागतील. कामाच्या ठिकाणी थोडी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होईल पण धैर्याने वागल्यास यश मिळेल. व्यवसायात भागीदारीतील काम लाभदायी ठरेल. आर्थिक स्थितीत थोडा चढ-उतार दिसेल. घरगुती जीवनात वडिलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी ठरेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल, विशेषत: डोळ्यांची व रक्तदाबाची काळजी घ्या.
तांब्याच्या पात्रात पाणी ठेवून सूर्याला अर्पण करा.
वृषभ
टारोट सूचित करते की या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांना आर्थिक स्थैर्य मिळेल. नोकरीत वरिष्ठांचा विश्वास मिळेल. व्यवसायात जुन्या संपर्कातून नफा होईल. घरगुती जीवन शांततामय राहील. आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा जाणवेल. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रांची मदत मिळेल. शत्रू निष्फळ ठरतील. समाजात सन्मान वाढेल. आध्यात्मिकतेत रस वाढेल.
गरजूंना दूध किंवा मिठाई दान करा.
मिथुन
या आठवड्यात मिथुन राशीच्या जातकांना नवीन संधी मिळतील. नोकरीत प्रगतीची शक्मयता आहे. व्यवसायात नफा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. घरगुती जीवनात आनंद राहील. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. प्रेमसंबंध गहिरे होतील. विवाहित जीवन गोड राहील. प्रवास उपयुक्त ठरेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. समाजात नाव वाढेल. शत्रूंवर विजय मिळेल. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल.
गरीब मुलांना पुस्तके दान करा.
कर्क
टारोटनुसार या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांना धैर्याने पुढे जाण्याची गरज आहे. नोकरीत बदल संभवतात. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक जीवनात काही वाद संभवतात पण संयम ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या, विशेषत: पचनतंत्राची. विद्यार्थ्यांना कठोर परिश्र्रमाने यश मिळेल. विवाहित जीवन समाधानकारक राहील. प्रवास फायदेशीर ठरेल.
चंद्राला पांढरे अन्न अर्पण करा.
सिंह
या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांसाठी टारोट कार्ड्स नवे संधी व प्रकाश दर्शवतात. कामकाजात यश लाभेल, वरिष्ठांचा विश्वास मिळेल. आर्थिक स्थितीत स्थैर्य येईल, जुने कर्ज कमी होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील, कुटुंबात एखादा सण-उत्सव साजरा होईल. आरोग्य उत्तम राहील, परंतु पोटाची काळजी घ्या. शत्रूंचे प्रयत्न निष्फळ ठरतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आत्मविश्वासाने निर्णय घेतल्यास यश निश्चित आहे.
गरीब मुलांना फळे दान करा
कन्या
या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांसाठी टारोट सूचित करते की संयम आणि स्थिरतेने प्रगती साधली जाईल. नोकरीत नको असताना नव्या जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात परिश्र्रमाने चांगला नफा मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जीवनात काही मतभेद संभवतात पण संवादाने ते दूर होतील. आरोग्याकडे लक्ष द्यावे, विशेषत: पचन व मानसिक ताणावर.
पोपटी रंगाचे वस्त्र दान करा.
तुला
या राशीच्या जातकांसाठी टारोट या आठवड्यात समतोल व सकारात्मकता दर्शवते. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात नफा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. घरगुती जीवनात आनंद राहील. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. प्रेमसंबंध गहिरे होतील. विवाहित जीवन गोड राहील. प्रवास उपयुक्त ठरेल. मित्रांची मदत मिळेल.
देवीला लाल फुले अर्पण करा व गरजूंना गोड पदार्थ द्या.
वृश्चिक
करिअरमध्ये महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, जुन्या प्रकल्पांना पूर्णविराम मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्च वाढू शकतो. कुटुंबातील वातावरणात थोडे चढ-उतार होतील, संवादाने गैरसमज मिटतील. आरोग्याकडे लक्ष द्या, विशेषत: रक्तदाब व तणावावर. विवाहित जीवनातील कटुता कमी होईल. प्रवासाचा योग.
मंगळवारी लाल वस्त्र परिधान करा
धनु
अचानक लाभ होऊ शकतो, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. करिअरमध्ये नवे दरवाजे उघडतील. व्यावसायिकांना मोठे सौदे मिळतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. आरोग्य सुधारेल पण प्रवासात काळजी घ्या. कुटुंबात शुभकार्याचे वातावरण राहील. प्रेमसंबंध गोड व रोमांचक होतील.
गरीबांना पिवळ्या मिठाया द्या.
मकर
कार्यक्षेत्रात राजकारणामुळे तणाव वाढू शकतो. आर्थिकदृष्ट्या गुंतवणूक टाळावी. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत थकवा व रक्तदाबाच्या समस्या संभवतात. विद्यार्थी विचलित होऊ शकतात. अनावश्यक वाद टाळा. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ थोड्या उशिराने मिळेल.
काळे तीळ आणि तेलाचे दान करा
कुंभ
कार्यक्षेत्रात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नातेसंबंध दृढ होतील. आरोग्य सुधारेल. प्रवास फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान मिळेल. कामात प्रगती होईल. मानसिक शांती अनुभवता येईल. मित्र व सहकारी मदतीला येतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. नियोजन यशस्वी होईल.
सोमवार पांढरे कपडे परिधान करा
मीन
कार्यक्षेत्रात अडथळे येतील पण चिकाटी ठेवा. आर्थिकदृष्ट्या सावधगिरी बाळगा. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. नातेसंबंधात गैरसमज संभवतात. आरोग्याच्या बाबतीत मानसिक अस्वस्थता व निद्रानाश त्रासदायक ठरू शकतो. प्रवास टाळावा. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल.
जलचरांना खाणे द्या
- तुम्हाला सुंदर, निरोगी आणि रोगमुक्त शरीर हवे असेल तर बुधवारी गव्हाच्या भाकरीवर गूळ ठेवून नंतर ते म्हशीला चारा. हा उपाय केल्याने तुमचे काम पूर्ण होण्यास सुऊवात होईल आणि तुम्हाला निरोगी शरीर मिळेल. 2. नवीन व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सकाळी आंघोळ करून मदारच्या रोपावर जाऊन रोळी-भात घालून विधीपूर्वक पूजा करा. त्यामुळे नवीन व्यवसायात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर होतील.





