दिनांक 11-12-2022 ते 17.12.2022 पर्यंत
मेष
आठवडय़ाची सुरुवात दमदार करण्याची इच्छा असेल तर तुमची नीतिमूल्ये, कार्यप्रवीणता आणि लोकसंग्रह यांचा विचार करणे गरजेचे असेल. या आठवडय़ात एखाद्या अशा व्यक्तीची भेट होईल ज्यामुळे काही अडलेली कामे पूर्ण होतील. याचबरोबर जवळच्या माणसाच्या भोंदूपणामुळे मानसिक त्रासाची संभावना आहे. कुटुंबातील व्यक्ती योग्य वेळी साथ देतील. तब्येतीची काळजी घ्यायला विसरू नका.
धार्मिक स्थळी दुधाचे दान द्यावे
वृषभ
या आठवडय़ामध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधण्याची संधी मिळेल. मन थोडे धार्मिक होईल. तीर्थक्षेत्राला किंवा जवळच्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल. नात्यांमध्ये कुठे ताणायचे आणि कुठे प्रेमाने वागायचे याचे संतुलन समजणे गरजेचे असेल. आरोग्याच्या छोटय़ामोठय़ा तक्रारी त्रास देतील. तुमच्या बोलण्यामुळे कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
धार्मिक स्थळी मूठभर बदाम दान द्यावे
मिथुन
आठवडा कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने खास असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या पाण्याच्या ठिकाणी पिकनिकला जाण्याचा प्लॅन कराल. संततीच्या बाबतीत थोडी काळजी वाटू शकते. एखाद्या समारंभात भाग घ्याल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल असे एखादे काम तुम्ही करून दाखवाल. हवामानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. प्रेमसंबंधात आनंद प्राप्त होईल. आर्थिक दृष्टय़ा समाधानी असाल.
पिवळी काचेची गोटी जवळ ठेवावी
कर्क
जे पेराल तेच उगवेल हा सृष्टीचा नियम लक्षात ठेवा. कोणत्याही कामात घाई गडबड केल्यास त्यात चूक होऊ शकते आणि दुसऱयाला त्याबद्दल बोलायचा चान्स मिळू शकतो हे ध्यानात घ्या. कामाच्या ठिकाणी काही माणसे तुमचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतील. याकरता आपल्या मनातील प्लॅन्स किंवा गुप्त गोष्टी कोणाबरोबरही शेअर करू नका. आर्थिक बाबतीत थोडी तंगी जाणवण्याची शक्मयता आहे.
लहान मुलींना हिरव्या वस्तूंचे दान द्यावे
सिंह
आर्थिक समाधान प्राप्त करून देणारा हा आठवडा असेल. कामाच्या ठिकाणी मन लावून काम केल्यामुळे कौतुकाला पात्र व्हाल. हा आठवडा काहीसा बिझी असणार आहे. अति काम केल्याने मानसिक ताण येऊ शकतो. कुटुंबात छोटे मोठे वाद त्रासदायक ठरतील. कोणतीही गोष्ट समजून घेतल्यानंतरच रिऍक्ट करा. तुमच्या वागण्या बोलण्याचा भलताच अर्थ आजूबाजूची माणसे काढू शकतात. आरोग्याला सांभाळावे लागेल.
धार्मिक पुस्तकाचे दान द्यावे
कन्या
भावनांचा कोंडमारा होऊ देऊ नका. जवळच्या माणसांशी मोकळेपणाने बोलण्याने मन हलके होईल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये इगोमुळे प्रॉब्लेम्स येतील. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या फंक्शनमध्ये भाग घ्याल. आर्थिकदृष्टय़ा सर्वसामान्य असा हा आठवडा असणार आहे. अगोदरपासून ज्यांना आरोग्याची तक्रार आहे त्यांनी सावध राहिलेले बरे.
डाव्या मनगटावर 369 आकडा हिरव्या शाईने लिहावा
तूळ
या आठवडय़ात बऱयाच प्रमाणात तुमचे मन करमणुकीकडे वळलेले असेल. मित्रांबरोबर पार्टी एन्जॉय कराल. नवीन ओळखी होतील. या ओळखीचा फायदा भविष्यातील प्रोजेक्टकरता होऊ शकतो. कौटुंबिक कामे वाढल्याने थोडा गोंधळ उडण्याची शक्मयता आहे. बरेच दिवस मनात घर करून होती ती इच्छा पूर्ण होईल. मधल्या काळात बिघडलेली तब्येत ठीक होऊ शकते. तणावापासून दूर रहा.
कोहळा दान द्यावा
वृश्चिक
मनात नकारात्मक भावनांना स्थान देऊ नका. काही घटना मनाविरुद्ध जरी घडल्या तरी पुढे जाऊन त्यातून फायदाच होईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची काळजी घ्यावी लागू शकते. एक घाव दोन तुकडे असा स्वभाव चालणार नाही. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कामाच्या ठिकाणी कामाचे प्रेशर वाढणार आहे. त्यासाठी मानसिक तयारी ठेवावी. प्रेमसंबंध सुधारतील.
तुळशीखालील माती जवळ ठेवा
धनु
कल्पनांना प्रत्यक्षात उतरवायला कष्ट घ्यावे लागतील. या आठवडय़ात कुटुंबीयांचा पाठिंबा थोडा कमी पडेल. आर्थिक बाजू भक्कम असली तरी बचत आणि गुंतवणूक याकडे लक्ष द्यावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. काम करण्याचा उत्साह थोडा कमी झाला आहे का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. कामाच्या ठिकाणी व्यर्थ वेळ वाया घालवू नका. प्रेमसंबंधात एक अनपेक्षित घटना घडण्याची शक्मयता आहे.
गरजूला अन्नदान करावे
मकर
कोण कसा वागतो आणि तो असा का वागतो याचा विचार करण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष द्या. स्वतःची तब्येत सांभाळा. आपल्याकडे असलेल्या क्षमता विकसित करण्याकरता योग्य वेळ आहे. त्याचबरोबर जिथे कमी पडता त्या गोष्टींना सुधारण्याकरताही योग्य वेळ आहे. आठवडय़ाच्या मध्यावर कामाचा बोजा वाढणार आहे. शनिवार-रविवार कुटुंबीयांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल.
वडाची मुळी जवळ ठेवावी
कुंभ
एका वेळी अनेक कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळ होण्याची शक्मयता आहे. या आठवडय़ात स्वतःबरोबर कुटुंबीयांनासुद्धा वेळ द्यावा लागेल. आरोग्याच्या किरकोळ समस्या त्रास देऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कामे मनासारखी पूर्ण होतील. दूरच्या नातेवाइकाकडून चांगली बातमी करण्याची शक्मयता आहे.
धार्मिक स्थळी केळी दान द्यावी
मीन
दुसऱयावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला हे लक्षात ठेवून हातात घेतलेली कामे पूर्ण करावी लागतील. कोणाचीही मदत मिळेल अशी अपेक्षा करू नका. कुटुंबातील ज्ये÷ व्यक्तीचे सहकार्य प्राप्त होईल. सरकारशी संबंधित एखादे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात यश मिळेल. आरोग्याच्याबाबतीत निष्काळजीपणा करून चालणार नाही. वैवाहिक जोडीदाराची मदत मिळेल.
तांब्याचे नाणे नदीत सोडावे
टॅरो उपायः एरंडाच्या झाडाची मुळी लाल करदोडय़ात बांधून तो करदोडा जर बाळंतपणात पडलेल्या स्त्रीच्या कमरेला बांधला तर तिची सुटका लवकर होते असा जुन्या जाणत्या लोकांचा विश्वास आहे





