वृत्तसंस्था/ बडोदा
भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू अक्षर पटेलचा येथे गुरुवारी महा पटेलशी विवाह झाला. या विवाह समारंभाला क्रिकेट क्षेत्रातील तसेच वधू-वराच्या कुटुंबातील निवडक सदस्य उपस्थित होते.
अलिकडेच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत अक्षर पटेल खेळला नव्हता. लंके विरुद्ध अलिकडेच झालेल्या टी-20 आणि वनडे मालिकेत अक्षर पटेलची कामगिरी दर्जेदार झाली होती. या समारंभाला भारतीय क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये ईशांत शर्मा आणि जयदेव उनादकट यांचा समावेश आहे.









