गाझीपूर
उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील दिवंगत मुख्तार अन्सारी याच्या घरी नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. रविवारी मुख्तार अन्सारी यांना श्र्रद्धांजली वाहण्यासाठी अखिलेश यादवही गाझीपूरला पोहोचले. अखिलेश यांनी दिवंगत माफियांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच मोठा भाऊ अफजल अन्सारी यांचीही भेट घेतली.
तुऊंगात असलेल्या मुख्तार अन्सारी याचा 28 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्मयाने मृत्यू झाला होता. तुऊंगात त्यांच्यावर विषप्रयोग केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर मुख्तार अन्सारीच्या तुऊंगात झालेल्या मृत्यूवरून समाजवादी पक्षासह विरोधकांनी निशाणा साधला होता. याचदरम्यान सपा प्रमुख अखिलेश यादवही रविवारी गाझीपूरला पोहोचले.









