बेळगाव प्रतिनिधि – विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. महाविद्यालयीन व्यवस्थापक मंडळ संबंधित खात्याला विचारा असे सांगते. तर संबंधित खात्याकडे गेले असता थातुर मातूर उत्तर दिली जात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ हेलपाटे घालावे लागत आहेत तेव्हा तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देण्यास भाग पाडावे याचबरोबर इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले . नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत दिला जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना नागरिक त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा त्यामध्येही सुधारणा करावी आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून निकाल द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी किरण दुकानदार सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









