Akhand Gurucharitra Parayana week starts tomorrow in Ottawa
ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिरात बुधवारी ३० नोव्हेंबरपासुन अखंड गुरुचरित्र पारायण सप्ताहास प्रारंभ होणार आहे. या पारायणाची सांगता बुधवारी ७ डिसेंबर रोजी दत्त जयंतीला होणार आहे.यानिमित्त समाधी मंदिरात सकाळी प. पू कुडाळकर महाराज समाधी व उत्सव मूर्तीचे पूजन, त्यानंतर गुरुचरित्र पोथ्यांचे पाच सुहासिनीच्याहस्ते मंत्र उच्चारात पूजन करण्यात येणार आहे. या अखंड गुरुचरित्र पारायण सप्ताहात अनेक साधक सहभाग घेणार आहेत.
भाविकांनी या पारायणाचा लाभ घ्यावा असे आवाहन समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त रवींद्र कुडाळकर आणि विश्वस्त अजित मांजरेकर यांनी केले आहे.
ओटवणे प्रतिनिधी









