क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
पेडे येथील इनडोअर संकुलातील बॉक्सिंग बाऊटमध्ये खेळविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंग खेळप्रकारात गोव्याच्या आकाश गोरखाने शेवटच्या 16 बॉक्सिंगपटूंन स्थान मिळविले आहे.
आता या स्पर्धेत गोवयाच्या 11 बॉक्सिंगपटूंनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. पुरूषांच्या 60 ते 63 किलो वजनीगटातील लाईट वॅल्टर विभागात आकाश गोरखाने उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना मणिपूरच्या रोहित निंगेहौगनचा 5-0 असा पराभव केला.
महिलांच्या 54 ते 57 एलीट फिदर विभागात गोव्याच्या अलिना डिसोझाला पराभव स्वीकारावा लागला. अलिनाला उप-उपान्त्यपूर्व फेरीत दिल्लीच्या आरती मेहरा हिच्याकडून 5-0 असे पराभूत व्हावे लागले. आज गोव्याच्या 7 बॉक्सिंगपटूंच्या उपान्त्यपूर्व लढती होतील.









