मुंबई
हवाई क्षेत्रातील कंपनी अकासा एअर 2030 पर्यंत शेअरबाजारात लिस्ट होणार असल्याची माहिती आहे. या संदर्भातील योजना कंपनीने आखली असून आयपीओ सादर करण्यासाठी थोडा उशीर होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 2027 पर्यंत कंपनीचा समभाग शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता दिसत नसल्याचेही स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. अकासा एअर कंपनीकडे सध्याला 20 विमाने आहेत आणि 2023 च्या अखेरपर्यंत तीन अंकी संख्येमध्ये विमानांची ऑर्डर देण्याची योजना आहे.









