नवी दिल्ली
प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीच्या अकासा एअरची विमानसेवा जुलै महिन्यात सुरू होणार असल्याचे समजते. जुलै अखेर विमानसेवा प्रत्यक्षात सुरू होईल असं सध्यातरी सांगितले जात आहे. जुलैच्या सुरुवातीला विमान सेवेसाठी तिकीट विक्री सुरू होणार आहे. सुरूवातीला 2 विमानांसह सदरची विमानसेवा सुरू केली जाणार असल्याचे समजते. 72 विमानांची ऑर्डर कंपनीने दिली आहे.









