, लक्ष्य सेन, प्रियांशू राजावतचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ बँकॉक
भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले तर आकर्षी कश्यप व उन्नती हुडा यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवून या सुपर 500 स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
लक्ष्य सेनला आयर्लंडच्या एन्हात एन्ग्युएनकडून तीन गेम्सच्या संघर्षानंतर 18-21, 21-9, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. सुमारे सव्वातास ही लढत रंगली होती. पहिला गेम गमविल्यानंतर लक्ष्य सेनला लय सापल्याने त्याने दुसरा गेम आक्रमक रॅलीजवर जिंकून बरोबरी साधली. मात्र निर्णायक तिसऱ्या गेममध्ये एन्ग्युएनने चुरशीने खेळ करीत 17-13 अशी बढत घेतली आणि नंतर हा गेम जिंकून सामनाही संपवला. प्रियांशू राजावतलाही पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याला इंडोनेशियाच्या अल्वी फरहानने 13-21, 21-17, 16-21 असे हरविले.
महिला एकेरीत आकर्षी कश्यपने रोमांचक ठरलेल्या सामन्यात जपानच्या काओरु सुगियामावर 21-16, 20-22, 22-20 अशी मात केली. यातील शेवटचे दोन गेम्स अतिशय चुरशीचे झाले आणि निर्णायक गेमच्या अंतिम टप्प्यात आकर्षीने समतोल राखत विजय साकार केला. अन्य एका सामन्यात उन्नती हुडानेही दुसरी फेरी गाठताना शानदार प्रदर्शन केले. तिने थायलंडच्या थमोनवान निथीटिक्रायचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव केला. मात्र रक्षिता श्री संतोष रामराजला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. तिला सिंगापूरच्या आठव्या मानांकित येओ ािज्या मिनने 21-18, 21-7 असे हरविले.









