बदलत्या ऋतूचा आपल्या शरीरावर अनेकदा परिणाम होतात.जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते तेव्हा सर्दी,खोकला बळावतो. अशावेळी सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी स्वयंपाकघरात असणारा ओवा खूप मदत करतो.ओव्याची चव सौम्य तुरट आणि तिखट असते.लोणची,पुरी आणि पराठ्याची चव वाढवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो.ओवा जशी खाण्याची चव वाढवतो तसाच त्याचा काढा सर्दी,खोकला कमी करण्यासाठी देखील फायद्याचा ठरतो.ओव्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरिअल सारखे गुणधर्म असतात.तसेच रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास ओवा मदत करतो. सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ओव्याचा काढा करून पिऊ शकता. हा काढा कसा बनवायचा चला जाणून घेऊया.
साहित्य
ओवा- 2 चमचे
मध-1 चमचा
काळी मिरी- छोटा एक चमचा
तुळशीची पाने-4 ते 5
लसूण पाकळ्या-2
असा बनवा काढा
काढा बनवण्यासाठी एका भांड्यात एक कप पाणी घ्या. त्यात ओवा, काळी मिरी, तुळशीची पाने, लसून पाकळ्या घाला. आता या पाण्याला गॅसवर चांगले उकळून घ्या. पाणी थोडे थंड झाल्यावर त्यात मध घाला.एकदम गरम पाण्यात मध घालू नका. पाणी कोमट होवू द्या. हा काढा दिवसातून दोनवेळा घ्या. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
टीप- वर दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









