नवी दिल्ली :
टाटाच्या मालकीच्या टायटन कंपनीच्या नव्या व्यवस्थापकीय संचालकपदी अजॉय चावलांची निवड करण्यात आली आहे. सदरची घोषणा कंपनीने नुकतीच केली आहे. सदरच्या पदाचा कार्यभार चावला हे पुढील वर्षी 1 जानेवारी 2026 पासून सांभाळणार असल्याचे समजते. कंपनीचा ज्वेलरी विभागातील कंपनी तनिष्कचा कार्यभार ते सांभाळतील. सध्याला असणारे सी के वेंकटरामन हे डिसेंबरमध्ये पायउतार होणार आहेत. यादरम्यान चावला यांना बोर्डावर घेण्यासह व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्याची प्रक्रिया अवलंबली जाणार आहे. भागधारकांचा या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळायचा आहे. चावला यांनी 2013 ते 2019 पर्यंत चिफ सेक्रेटरी ऑफिसर म्हणून टायटनमध्ये कार्य केले आहे. त्यांच्या कालावधीत त्यांनी सुगंध व्यवसायाला उभारी देताना टनेरिया हा ब्रँड सादर केला.









