अजमेर : राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी हॉटेल नाझमध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. आग इतक्या वेगाने पसरली की काही मिनिटांतच तिने संपूर्ण हॉटेलला वेढले. या अपघातात एका निष्पाप मुलासह चार जणांचा जळून मृत्यू झाला, तर इतर चार जण गंभीर स्वरुपात होरपळले आहेत. आगीच्या ज्वाळा हॉटेलच्या पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचल्यामुळे अनेक लोकांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सकाळी 8 वाजता हॉटेलच्या तळमजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग मीटर बॉक्स आणि वायरिंगमध्येच मर्यादित होती, परंतु काही मिनिटांतच ती फर्निचर आणि पीओपी सिलिंगमध्ये पसरली. काही क्षणातच आगीने संपूर्ण हॉटेलला वेढले. आग इतक्या वेगाने पसरली की ती अवघ्या अर्ध्या तासात हॉटेलच्या पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत पुरवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीची घोषणाही करण्यात आली आहे.
Previous Articleछोट्या कारचे घर
Next Article तहव्वूर राणाच्या आवाजाचे नमुने घेण्यास अनुमती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









