ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अजित पवार आज पहिल्यांदाच माझ्यासोबत बसले आहेत. दादा, आज तुम्ही योग्य जागेवर बसलात. पण या जागेवर बसण्यासाठी थोडा उशीरच केलात, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात बोलताना केलं.
अमित शाह यांच्या हस्ते आज ‘सहकार से समृद्धी’ या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
शाह म्हणाले, अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्यासोबत बसलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजितदादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात. हीच तुमची योग्य जागा आहे. याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केलात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारातून समृद्धीकडेच संकल्प घेतला आहे. मोदींनी गेल्या 9 वर्षात 60 कोटींहून अधिक गरीब लोकांना सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मदत केली आहे.








