वय झाल्यानंतर आपण थांबायचे असते. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय ७५ झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. ८० वय झालं तरी माणूस थांबत नाही’, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना लगावला आहे. कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
बहुजनांच्या कल्याणासाठी आपण सत्तेत गेलो आहोत. वय झाल्यानंतर आपण थांबायचं असतं. काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय ७५ झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. आम्ही देखील ५ वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. राष्ट्रवादीची सर्व नेतेमंडळी चांगल्या प्रकारे काम करत आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.








