मुंबई;अनिल परब यांच्यावर कोणत्या पद्धतीची कारवाई झाली माहिती नाही. पण केंदीय यंत्रणाच गैरवापर होऊ नये हीच माफक अपेक्षा आहे. असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कुणांनंतर कोणाचा नंबर लागणार हे काहींनी बोलून दाखवलं होत. काही नेते जे बोलत आहे तेच घडत आहे, असल्याचे अजित पवार यांनी सांगत एकप्रकारे यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचं जाणवून दिले आहे. त्यापुढे अजित पवार म्हणाले, ‘ कायद्याने यंत्रणेला छापेमारी आणि तपास करण्याचा अधिकार आहे, मात्र तो कारभार पारदर्शी असावा,यंत्रणांनी अधिकाराचा गैरवापर करू नये. असेही पवार म्हणाले.
अधिक वाचा- अनिल परबांच्या कारवाईवर संजय राऊतांचा इशारा
https://tarunbharat.com/ed-raids-anil-parab-house-sanjay-raut-criticism-on-bjp-tbt-political-news/