“सध्याच्या घडीला महाराष्ट्राचं राजकारण सांभाळू शकेल, असा अजित पवारांसारखा दुसरा तोलामोलाचा नेता महाराष्ट्रात नाही, हे दस्तुरखुद्द अमित शाह यांनी कबुल केलं आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणारच आहेत. वेट अँड वॉच. अस वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.ते बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. तसेच मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे सक्तीच्या रजेवर गेले आहेत, त्याचा कृपा करून याच्याशी संबंध लावू नका” असा उपरोधिक टोलाही मिटकरींनी लगावला.
गेल्य़ा काही दिवसापासून विरोधीपक्ष नेते अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार असे बॅनर झळकले होते. तर अजित पवार भाजपात प्रवेश करणार अशा वावड्या उठल्या होत्या. त्यावर अजित पवार यांनी राष्ट्रवादीतच राहणार अस स्पष्ट सांगितलं. मात्र आता अजित पवार मुख्यमंत्री होणार अस वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








