व्हनाळी ,वार्ताहर
केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्यास उद्या शुक्रवार दि.17 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते अजितदादा पवार सदिच्छा भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत माजी ग्रामविकसमंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी गृहमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष ए.वाय.पाटील, आमदार के.पी.पाटील, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ, अंबरिषसिंह घाटगे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती अन्नपुर्णा चे संस्थापक चेअरमनन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना घाटगे म्हणाले, अन्नपुर्णा कारखान्याची स्थपना 7 मार्च 2021 रोजी झाली. प्रतिदिन 1500 मेट्रीक टन गळप क्षमतेचा हा प्रकल्प आहे. पहिला ट्रायल सिझन 9 अक्टोंबर 2021 रोजी सुरू झाला. कारखान्याचा यंदाचा 2 रा गळीत हंगाम सिझन असून यंदा 1 लाख 75 हजार 132 मेट्रीक टन इतक्या गाळपाचा टप्पा कारखान्याने पुर्ण केला आहे. उत्पदित होणाऱ्या केमिकल फ्री गुळपावडर व सल्फर लेस खांडसरी साखरेला सतत्याने मागणी वाढ आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्शवत सल्फर लेस, केमिकल फ्री जॅगरी पावडर व सल्फर लेस, केमिकल फ्री खांडसरी साखर उत्पादन निमिर्तीचा हा प्रकल्प आहे. त्या पार्श्वभुमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सदिच्छा भेट देवून कारखान्याची पहाणी करणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख कार्यकर्ते शेतकरी सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषेदेस निराधार समितीचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे, शिवशिंग घाटगे, धनाजी गोधडे, मल्हारी पाटील, विश्वास दिंडोर्ले, एम.बी.पाटील, बाजीराव पाटील (केनवडे) आदी उपस्थित होते.
Previous ArticleGood news : इलेक्ट्रिक वाहनात 300 टक्के वाढ,सरकारी ताफ्यातही 50 लाख इलेक्ट्रिक वाहने येणार
Next Article महाशिवरात्रीसाठी बनवा उपवासाची खमंग बटाटा पुरी









